Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

नाशिकचे सुपुत्र: भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके !

भारतीय चित्रपट सृष्टीचे निकोला टेस्ला, आयुष्य म्हणजे ज्यांच्यासाठी प्रयोगशाळा होती आणि अपयश म्हणजे नविन काहीतरी करण्यासाठीची चालना, छायाचित्रकार, वास्तुशिल्पकार, चित्रपटाचे अ पासून ज्ञ, मराठी माणूस आणि आमच्या नाशिकचे पुत्र "दादासाहेब फाळके" यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो
चित्रपट
राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)
मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३)
सावित्री सत्यवान (इ.स. १९१४)
श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८)
कालिया मर्दन (इ.स. १९१९)
सेतुबंधन (इ.स. १९३२)

गंगावतरण (इ.स. १९३७)