Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

असा आहे माझा नाशिक जिल्हा ! नक्की वाचा

असा माझा नाशिक जिल्हा
जेथे महारूद्र हनुमानाचा जन्म झाला तो अंजनेरी पर्वत आहे नाशिक मध्ये
जेथे प्रभु रामचंद्र आनि लक्ष्मण सीतामाई
सह पर्णकुटी बनवून ज्या क्षेत्री निवास
केला ती पंचवटी आहे नाशिक मध्ये
 
जेथे गंगेचा उगम झाला तेथे श्री शिवशंभू ब्रम्हा , महेशासह निवास करतात अस श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आहे नाशिक मध्ये
जेथे आदिमाया शक्ति सात शीखरांवर निवास करते भगवती सप्तशृंगी ते वणी नांदुरी गाव जेथे हजारो भाविक खान्देशाहून पायी पयी येतात असे अर्ध शक्तिपीठ आहे नाशिक मध्ये
थोर स्वातंत्र्य सेनानी, वि दा सावरकर जेथे तयार झाले ते भगूर गाव आहे नाशिक मध्ये
अहिल्याबाई होळकरांची राजधानी त्याचा अप्रतिम रंगमहाल चांदवड तालूक्यात
आहे नाशिक मध्ये
महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजूरीचा खंडोबा जीच्या पायी वेडा झाला
चाकरी केली मेंढर हाकली अशी
बाणूबाई तीचे चंदनपूरी गाव मालेगाव
तालूक्यात आहे नाशिक मध्ये

 Someshwar Waterfall Nashik
नारोशंकरांचा बालेकील्ला , उत्तम हातमाग महाराजा सयाजीराव गायकवाड ह्यांचे जन्मगाव कवळाने
(राजान कवळानं अहीराणीत म्हणतात) झोडग्याचे शिवमंदीर
हे आहे मालेगावात आहे नाशिक मध्ये
देवमालेदार यशवंत महाराज जेथे राहीले ती (बागलाण) सटाणा नगरी
आहे नाशिक मध्ये.
श्री.क्षेत्र पाळे बुद्रुक ता.कळवण येथे स्वयंभु श्री.रामेश्र्वराचे प्रशस्त मंदिर आहे.महाशिवरात्र व श्रावण महिन्यात दर्शनासाठी व अभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
Gondeshwar Temple Sinner
कादवा साखर कारखाना जेथे आहे
जेथे सर्वात मोठी मैदानी लढाई सूरतेच्या लूटीनंतर शिवकाळात झाली
गुरू दत्तत्रेयांचे आजोळ करंजी गाव
अखिल भारतीय स्वामि समर्थ प्रधान केंद्र असा दिंडोरी तालुका आहे नाशिक मध्ये
रानमेव्याने भरपूर करवंद जांभळ
कैर्या स्वादिष्ट भाताची पीक जेथे
घेतली जातात असे पेठ सुरगाणा
आहे नाशिक मध्ये
गोंदेश्वर मंदीर , पीक पाण्याने समृध्द
भैरवनाथाचे मंदीर असा सिन्नर तालूका , नैताळे ची मतोबा यात्रा, कंपनीचा तालूका निफाड आहे नाशिक मध्ये
जगविख्यात कवी कुसूमाग्रज वी वा शिरवाडकरांचे गाव शिरवाडे वणी
आहे नाशिक मध्ये
नांदुरमाधमेश्वर पक्षी अभयारण्य जेथे
हजारो पक्षी विदेशाहून येतात
आहे नाशिक मध्ये
 sita gufa nashik
विपश्यणा भवन धम्मगीरी जेथे परदेशातून लोक येतात ते आहे इगतपूरी तालूक्यात आहे नाशिक मध्ये
भारतिय चित्रपट सृष्टिचे जनक दादासाहेब फाळके ह्यांचे गाव म्हणजे नाशिक
कुंभमेळयाचे स्थान, कर्हाड बंधूचा चिवडा , दक्षिण गंगा गोदावरी चे तिर्थक्षेत्र , द्राक्षांचा जिल्हा म्हणजे नाशिक
पैठण्याची नजाकत , रेशमी पैठण्याचे
माहेरघर येवला सेनापती तात्या टोपेचा येवलानाशकात आहे
सदा शीतल वातावरणाचा जिल्हा
म्हणजे माझ नाशिक कसमादे (कळवण, सटाणा,मालेगाव, देवळा) अहीराणी प्रांत , चांदवड , नांदगाव ते इगतपूरी ,दिंडोरी दख्खन प्रांत , तर पेठ सूरगाणा,त्रंबकेश्वर कोकण प्रांत
अशी विवीधता माझ्या नाशकात आहे

असा माझा नाशिक जिल्हा
नुसता द्राक्षाचा किल्ला ” नाही तर कांदा चा बाल किल्ला आहे.
नाशिककर असाल तर पुढे नक्की पाठवा
मी नाशिककर