Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

नाशिक मधील पाड्यावरच्या आदिवासी मुलांनी अनुभवला 'हेअर फॅशन डे', नाशिकच्या लक्झरी सलूनचा अभिनव उपक्रम !

Jawed-habib-nashik-social-work
आपण नेहमी पाहतो कि आदीवासी पाडा म्हंटले कि अतिशय हलाखीची परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली आव्हाने. पण नाशिक मधील खारोली आदिवासी पाड्यावर मात्र वेगळेच वातावरण तयार झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रचंड मेहनतीमुळे संपूर्ण गाव प्रगतीच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. गावाची प्राथमिक शाळा सुद्धा झपाट्याने बदलते आहे. 
Jawed-habib-nashik-social-work 

Jawed-habib-nashik-social-work

नुकताच जावेद हबीब या प्रसिद्ध हेअर ड्रेसिंग ब्रँड च्या नाशिक शाखेने "गिव्ह - GIVE" (Get Involved in Village Empowerment) या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने खारोली च्या प्राथमिक शाळेत "हेअर फॅशन डे" साजरा केला. शाळेतील सगळ्या मुलामुलींचा हेअर कट जावेद हबीब च्या टीम ने केला. हे करत असताना जसे सलून मध्ये येणारे ग्राहक अतिशय आदराने वागविले जातात आणि त्यांना अतिशय आधुनिक सेवा दिली जाते. अगदी तश्याच पद्धतीने आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची बडदास्त ठेवली गेली. हेअर कट करताना विविध आधुनिक उपकरणे वापरली गेली. मुलामुलींचे वेगवेगळे कात केले गेले. याच बरोबर गावातील तरुण मुलामुलींना या नवीन रोजगार देणारया क्षेत्राची ओळख करून दिली गेली. 

Jawed-habib-nashik-social-work

Jawed-habib-nashik-social-work

Jawed-habib-nashik-social-work


संपूर्ण गावात यामुळे एक वेगळेच आनन्दाचे वातावरण तयार झाले होते. शहरातील लोकांचे जीवन कसे असते याबद्दल सुद्धा गावातील लोकांना एक वेगळा अनुभव मिळाला. हेअर कट झालेल्या मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यातच आदिवासी पाड्यावरील या चिमुकल्यानीसुद्द्धा आपल्याला सुंदर सुंदर हेअर कात करणाऱ्या जावेद हबीब च्या हेअर ड्रेसर्स ला अगदी मिठी मारून धन्यवाद दिले. 

adiwasi village nashik social work

सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह बघत बघत जावेद हबीब नाशिक ची टीम आणि गिव्ह चे कार्यकर्ते आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. अश्या प्रकारचे अभिनव उपक्रम निश्चितच समाजाला एकत्र आणत असतात तसेच गावातील मुलामुलांनी प्रगत जगाची ओळख आणि अनुभव देत असतात. निश्चितच भविष्यात अश्या छोट्या छोट्या गावातून अनेक गुणवान लोक निर्माण होतील आणि कदाचित पुढचा जावेद हबीब एखाद्या खारोली सारख्या छोट्या पाड्यातून आला असेल !   

Jawed-habib-nashik-social-work