Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

नाशिक मध्ये रस्त्यावर जीवन व्यतीत करणाऱ्या बेवारस लोकांना दिले नवीन जीवन !

आज आम्ही *एकच धर्म मानवधर्म फाउंडेशनच्या* सर्व सदस्यांनी नासिक शहरातील वृद्ध पुरुष, महिला तसेच मनोरुग्ण शोधुन त्यांची दाढी कटिंग करुन त्यांना आंघोळ घालून नवीन कपडे घालायला दिले..


आज रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ पासुन आम्ही आमच्या संस्थेमार्फत हा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. आज आम्ही पंचवटी, मखमलाबाद नाका, आडगाव, जत्रा हॉटेल परिसरातील वृद्ध पुरुष, महिला, मनोरुग्ण शोधुन त्यांची दाढी कटिंग करुन त्यांना आंघोळ घातली, त्यांचे जुने मळलेले फाटलेले कपडे जाळुन टाकले आणि त्यांना नविन कपडे घालायला दिले.. त्यासाठी आम्हाला अनेक दानशुर व्यक्तींनी हेल्प केली.. 

आम्ही जेव्हा त्या लोकांना आंघोळ घालायला गेलो तेव्हा त्यांना खुप आनंद झाला. त्या लोकांनी स्व:ताच्या हाताने साबण, डेटॉल टाकलेल्या पाण्याने आंघोळ केली, आम्ही दिलेले नवीन कपडे आनंदाने घातले. त्यातील अनेकांनी बऱ्याच दिवसांपासुन अंघोळ केलेली नव्हती. चांगले कपडे ही त्यांच्याकडे घालायला नव्हते. आम्ही त्यांना दाढी, कटिंग करुन अंघोळ घातल्याने त्यांना खुप बरे वाटले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद, ते समाधान बघुन आम्हाला आपण करत असलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटले.. 


या कामात मी सुलक्षणा आहेर, श्री. रिकी सुधिर धोंड दादा, सुरज सुधिर धोंड दादा, आणि आमच्या काही मित्रांनी आज सहकार्य केले. तसेच अमोल कुलकर्णी सरांनी आम्हाला दोन पाण्याचे ड्रम घेउन दिले.
आम्ही करत असलेले काम बघुन रस्त्याने जाणाऱ्या अनेक लोकांनी आम्हाला थांबुन आमच्या कामाची चौकशी केली, काहिंनी आमच्या बरोबर काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.. लवकरच आपले हे काम खुप मोठ्या चळवळीत रुपांतरीत होणार आहे यात शंकाच नाही.. 


आम्ही आता प्रत्येक रविवारी हा उपक्रम करणार आहोत. आपणापैकी कोणाला आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा असल्यास आमच्याशी नक्की संपर्क करा. तसेच आपल्याला आपल्या परिसरात असे वृद्ध महिला किंवा पुरुष आणि अनाथ मनोरुग्ण आढळल्यास त्वरीत आम्हाला कळवा.. आपण सर्व मिळुन त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करु.. 


आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील अश्या वंचीत, गरजू, अनाथ, अपंग, वृद्ध, मनोरुग्ण लोकांसाठी आपण काहितरी करायला हवे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. आपणाला आम्हाला आमच्या कार्यात मदत करण्यासाठी आपण आपल्याजवळील मोठ्या माणसांचे कपडे, शर्ट, पॅंट, साड्या, शॉल वगैरे कपडे स्वच्छ धुवुन आम्हाला दिल्यास खुप मदत होईल.. आपण श्री. राहुल विंचुरकर आणि श्री. रिकी धोंड यांच्या नंबरवर कॉल करुन आम्हाला मदतीचा हात द्यावा ही आपणाकडुन अपेक्षा आहे.. नवीन कपडे, साड्या दिल्यास अधीक योग्य होईल.. आपण केलेली मदत योग्य गरजू व्यक्तींपर्यंतच पोहोचेल याची खात्री बाळगा..
आम्ही आमच्या *एकच धर्म मानव धर्म फाउंडेशन* या सामाजीक संस्थेमार्फत नेहमीच समाजातील वंचीत, गरजू घटकांसाठी कार्य करत राहणार आहोत.. आपल्या सकार्याची अपेक्षा आहे.. 🙏
धन्यवाद..