Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

नक्की वाचा इतिहास नाशिकमधील रहाडीचा !


रहाड..रंगपंचमी नाशिकची खासियत..रंगपंचमी खेळण्याची नाशिकरांची पध्दत काही औरच आहे..साधारणपणे 25 बाय 25 फुटाचे ..8 फुट खोलीचे दगडी हौद (पेशवे कालीन) नाशकात खोदलेले आहेत.शनीचौक पंचवटी..गुलाबी रंगाची..मानकरी सरदार रास्ते आखाडा तालिम संघ.. गाडगे महाराज पुलाजवळ..पिवळारंग.रोकडोबा तालिम संघ..तिवंधा केशरी मधळी होळी तालमी जवळ ..केशरी नारंगी रंगाच्या वैशिष्ट्यपूर्णा सह.. विधी पुजन करुन.. रंग उकळून टाकला जात असे,...
नाशिकमधील रहाड

रंग इतका पक्का असतो कि ऐकदा यात उडी मारली कि किमान दोन दिवस तरी रंग निघत नाही..हजारो मंडळी यात उड्या मारुन अंधोळ करतांत..उडी मारण्याच्या एक पध्दतीला" धप्पा.".मारला असे मजेदार नाव आहे.धप्पा मारल्यावर किमान 20 ते 25 माणसाच्या अंगावर रंगाचे पाणी उडालेच म्हणून समजा .उत्तम उडी मारणाराच घप्यात तरबेज होतो..कारे राहाडीत धप्पा मारला नाही वाटतो.. या वर्षी ..आंगावर रंग नाही या वरुन रंग पंचमी खेळळी की नाही हे नाशिकर ओळखत असे..

रहाड म्हणजे पुर्वी गल्लीतील तालमी तीलमी च्या पहेलवान मंडळी च्या गटा तटांची.. शक्ती प्रदर्शनाची जागाच जणू..रंगपंचमीच्या निमित्ताने.. राहाडी वर ये मग पाहून घेतो तुझ्या कडे असा पूर्व संबधाच्या वादाचा इशारा पण असे..मग काय राहाडी वर.किरकोळ हाण्यामार-या...राहाडा..हा शब्दप्रयोग दोन समुहातील भांडण या अर्थाने मराठी भाषेत रुढ झाला .. रंगपंचमी च्या दिवशी.पक्का नाशिकर राहाडी वर जाउन..रंगात उडी मारुणच येणार.. आबाल ,वृद्ध ,तरुण ,तरुणी, मोठया आनंदाने यात सहभागी होतात..जोडीला नाशिक चा ढोल पथक.बेफान नृत्य याची सर.यायची नाही.या करता यावे लागेल राहाडी वर...चला रंग खेळूया..धमाल..रंगपंचमीला..!..