Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

अशी आहे कथा आहे माझ्या काळ्यारामाची...सुंदर आहे माझ्या काळ्यारामाची...
गोदाघाटावरची पंचवटी ....

🌳 🌳 🌳 🌳 🌳
-----------------------------------------
पूर्वी लेखन कला उपलब्ध नव्हती त्यामुळं शिल्प कलेच्या माध्यमातून आपले विचार मांडावे लागत.....
श्री काळाराम मंदिर .....
श्री क्षेत्र  नासिक मधील पुण्य नगरी पंचवटी येथील संपूर्ण भारतात प्रसिद्ध असे श्रद्धा स्थान ...
प्रभु रामचंद्र आपल्या वनवास काळातील १४ वर्षाच्या काळापैकी २ वर्षे येथे राहिले .
नासिक नगरी त्यावेळी दंडकारण्य म्हणून ओळखले जात असे राक्षसांचा वास असलेल्या या जागी जंगल होते ,येथे शुर्पनखा नावाची राक्षसी होती लक्ष्मणाने तीचे नाक व कान  छाटले,नाक गोदावरी नदीच्या पलीकडे पडले म्हणून त्या भागाला नासिक हे नाव पडले व अलीकडील भागाला पंचवटी .
पाच वडाच्या झाडांचा समुह म्हणून पंचवटी .
ही पाचही झाडे सितागुंफा येथे आहे .
सोन्याचा कळस असलेले


श्री काळाराम मंदिर ......

पूर्वी लाकडी असलेले हे मंदिर ....
दगडी बांधकाम
सन.१७७२ते१७८४ या काळात म्हणजे १२ वर्षे दगडी मंदिर बांधकाम चालले पेशवे सरदार श्री रंगराव ओढेकर (गाव ओढा)यांनी २३ लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधले दोन दगडांचा जोड देणे कामी गुळ,चुना व दुधाची साय यांचे मिश्रण वापरले  मात्र कळस बनविण्यासाठी त्याचेकडे पैसे नव्हते त्या वेळी त्यांच्या पत्नी ने हीरे जवाहरात आसलेली नाकातील नथ मोडून २.५कीलो वजन असलेला कळस चढवीला (सोने भाव ८आणे तोळा/५० पैसे )
मंदिरात असलेल्या मूर्ती स्वयंभू असून गोदावरी पात्रात ज्या ठिकाणी या मूर्ती मिळाल्या तेच आजचे रामकुंड ,लक्षण कुंड व सिताकुंड होय.
पूर्व महाद्वारावर विस्तीर्ण नगारखाना आहे .
पूर्व दरवाजाने आत गेले की ...
मारुती मंदिर लागते त्याच्या आवारास सभामंडप म्हणतात तेथून बाहेर पडले १४ पायऱ्या चढून गेले की मुख्य दर्शन  ....

शिल्प वाचन...
संपूर्ण मंदिरात ८४ खांब
(८४ लाख जन्म प्रतिक )
हनुमान मंदिर ४० खांब
(हनुमान चालीसा)
१४ पायऱ्या चढून मंदिर प्रवेश
(१४ वर्षे वनवास )
म्हणजे ८४ लाख जन्म मरण फेऱ्या मधून मुक्ती मिळवीण्यासाठी हनुमान चालीसा  वाचून रामा पर्यत पोहोचता येते .

माहिती - ✍🏼जेष्ठ गाईड नागरे बाबा,राजु अव्हाड,राजु परदेशी