Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

‪#‎नाशिक‬ चा विकास पुराने केला भकास


 
आज गोदापात्रातील पाण्याची पातळी वाढत असताना मला एका मित्राचा फोन आला. तो घाबरत घाबरत बोलला अरे पुन्हा गंगापूर धरणातून खूप पाणी सोडणार आहे आणि महापूर येणार असे ऐकले.
मी म्हटले जाऊदे ना बाबा, तू कशाला काळजी करतो ? होईल ते होईल !
त्यावर तो एकदम चिडून म्हणाला "काय हा बेजबाबदारपणा आणि असंवेदनशीलता" ....
मग मी त्याला विचारले
अरे दादा जेंव्हा ते "सीप्लेन" गंगापूर धरणात उतरले आणि आम्ही ५-१० लोकांनी विरोध केला तेंव्हा तूच मला अक्कल शिकवत होता ना कि उगाच तुम्ही पर्यावरणवादी विकासाला विरोध करता
नंतर तो धरणातला बोट क्लब आम्ही बंद पाडला तेंव्हा तर तू किती चिडला कि मी कुटुंबाला घेऊन २ निवांत क्षण कुठे घालवू आणि दूषणे देऊ लागला
काय ते गोदापार्क नदीत बांधले तर भूमिपूजनाचे फोटो तूच पाठवले मला... गोदापात्रात कॉंक्रिट नका टाकू असे सांगणारे आम्ही थोडे थोडके लोक "वेडे" होतो ना
आता कशाला घाबरतो ?
तुझे "नेते" देवापेक्षा "शक्तिमान" आहेत आणि "अधिकारी / ठेकेदार" ब्रह्मदेवापेक्षा हुशार ....
सांग त्यांना वाचवायला
माझ्या प्रश्नाची उत्तरे तो देऊ शकणार नाही हे मला माहित आहे पण आज हि मला त्याचा राग नाही "दया" आली हा माझा चांगुलपणा