Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

नाशिकच्या संस्कृतीतील एक अविभाज्य घटक - हरिहर भेट !!


नाशिकच्या संस्कृतीतील एक अविभाज्य घटक म्हणजे हरिहर भेट !!
रविवार कारंजा येथील सुंदर नारायण मंदिर आणि प्रसिद्ध कपालेश्वर मंदिर ह्यांची हरिहर भेट त्रिपुरारी पौर्णिमेला घडत असते …
आरसे वापरून दोन्ही मूर्त्यांना एकमेकांचे मुख दर्शन ह्या दिवशी घडवले जाते …
ह्या वर्षी पुरोहित संघाने मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक भिंती आणि वस्तू हटवल्या आहेत …
सुंदर नारायण मंदिर येथे ११ तारखे पर्यंत एक सप्ताह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होत आहेत …
नाशिक मधील अनेक नवीन नागरिकांना ह्या भेटी बद्दल कल्पना नसते पण हा एक बघण्याजोगा उत्सव असतो …
मी नाशिककर परिवारातर्फे आपणास विनंती आहे कि ह्याचा नक्की आस्वाद घ्यावा ।